+91 90219 62406 varsha.samarthavastu@gmail.com

Vastu Hacks & Guides

Master your home's energy flow with expert spatial advice

Devghar Setup
Featured Guide

देव्हारा (Prayer Room) Vastu Guidelines

घरातील देव्हारा ही देवाच्या प्रार्थनेची पवित्र जागा असते. देव्हाऱ्याची जागा हा घराचा अत्यंत शांत भाग असला तर तेथे दैवी शक्ती भरून राहते.

  • ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे, देव्हाऱ्याची योग्य जागा ईशान्य कोपऱ्यातच असावी.
  • वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते.
  • ईशान्य कोपरा शक्य नसल्यास, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे देव्हारा ठेवला तरी हरकत नाही.
  • देव्हारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये, असल्यास अति पीडा उद्भवण्याचा संभव असतो.
  • देव्हारा शयनगृहात नसावा. शक्य नसल्यास देव्हाऱ्यासमोर लाकडी पार्टिशन किंवा पडद्याची व्यवस्था करावी.
  • देव्हाऱ्याच्या वर किंवा खाली शौचालय अजिबात नसावे.
  • देव्हारा थेट जमिनीवर ठेवू नये; एक चौथरा तयार करावा किंवा संगमरवरी/लाकडी मांडणी करावी.
  • काचेचा किंवा अक्रिलिक देव्हारा टाळावा. कळस असावा किंवा नसावा याविषयी नियमांचे पालन करावे.
Note: देव्हाऱ्याची जागा बदलत असताना नेहमी आपल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

More Vastu Hacks Dropping Soon

Stay tuned for bedroom optimization, kitchen placement hacks, and office workspace grids.